एक नट म्हणून काम करत असताना अनेक गोष्टींचा विचार केला जातोय..
विजया बाई, सत्यदेव दुबे या दोघांचा मराठी रंगभूमीवरील प्रभाव आणि त्या दृष्टीने केला जाणारा विचार..
विजया बाई, दुबेजी, भालबा यांसारखे प्रायोगिक दिग्दर्शक..
केंकरे, कदम, मोने यांसारखे अलीकडचे व्यावसायिक दिग्दर्शक..
डॉ. लागू, डॉ. आगाशे, निळू फुले, मोहन गोखले, गजानन परांजपे यांसारखे नट..
तेंडूलकर, एलकुंचवार, आळेकर, खानोलकर, गो पु देशपांडे यांसारखे लेखक..
अशाप्रकारे मराठीमध्येच एवढा मोठा गोतावळा आहे...
मग भारता मध्ये..
अल्काझी, रतन थिय्याम, कावालम पणीक्कर, हबीब तन्वीर, बी जयश्री, विना पाणी चावला..
सफदर हाश्मी, उत्पल दत्त, गिरीश कर्नाड, बादल सरकार..
या सगळ्यांकडे..
किंवा मग जगामध्ये
पिटर ब्रूक, आर्तो, ग्रोतोव्स्की, स्तनिस्लाव्स्की, मेयरहोल्ड, ब्रेख्त, बार्बा, बोअल..
टेनिसी विल्यम्स, सार्त्र, कामू, मिलर, इब्सेन, सोफोक्लीज, शेक्सपिअर, पिरांदेल्लो..
सगळ्यांना समजून घ्यायचं ?
कि हे मला समजलेत..?
यांनीच ठरवलेलं मी करतोय.. ?
आणि आता मला नव्याचा, माझ्या आतल्या कशाचातरी शोध घ्यायचाय ?
Tuesday, December 8, 2009
Subscribe to:
Posts (Atom)
.jpg)