मला तुझ्या डोळ्यातून जग बघायचय,
मला तुझ्या डोळ्यातून जग दाखव..
डोळ्यातले थेम्ब,
विरघलून अंगणात,
बाहुल्यांमधलं आभाळ,
स्वच्छंद चांदण्यात..
दिसू दे मला स्वप्नांचा झरा,
तुझ ते विश्व, त्याचा पसारा,
तुझ हे मन, किती व्यापून,
राग, लोभ, सुख - दुःख भोगून..
असू दे, राहू दे,
नको ते जग,
ज्याने पीड़ा दिली,
तुला ही खुप..
तुझ्या डोळ्यात,
विश्व साचले,
डोळ्यात सारे,
निमूट वाचले..
डोळे तुझे गोल,
बोलके किती,
सारी सृष्टि तिथे,
थयथय नाचती..
शांत, एकांत,
आकांत, खंत..
नाजुक, बोलके,
हलके डूलले,
बोलले, हसले,
रुसले, कण्हले,
म्हटले सगले,
काही ना म्हटले,
डोळ्यात साचली,
सगळी चांदणी,
फिरली नक्षत्रे,
दाटले पाणी,
वर्षाव सर्वाचा,
एकत्र झाला,
सारा संसार,
वाहून नेला..
बघायचे जग, नको राहुनी जायला..
मला तुझ्या डोळ्यातून जग दाखव..
मला तुझ्या डोळ्यातून जग बघायचय..
Monday, August 30, 2010
Sunday, August 29, 2010
विठ्ठल स्वतः..
देवाचे देवपण,
देवात दडून,
देव हा पडून,
तुझ्यामंदी..
देवाचा गाभारा,
मनाचा आसरा,
तरी हा पसारा,
उरलासे..
विठ्ठलची आशा,
विठ्ठलची दिशा..
विठ्ठल सखा,
विठ्ठल स्वतः..
भोवती फिरुनी,
उरे ती नेणिव,
दिगन्ताची..
संत हे म्हणती,
कृती जे करती,
विठ्ठल ते होती,
ब्रम्हांडीचे..
Thursday, August 26, 2010
माझ काय ?
रंध्रान्मधे..
मी तुझीच आहे..
माझ सर्वस्व तुला,
तुझ,
तुझ्यासाठी..
मी
माझा
अहं
सोडून.
तू
तुझ
तुझा
तुझ्यासाठी
माझ सगळ
तिच्या कुशीत
तिच्यापाशी
तिच्याकडे
तिची नजर
दूरवर
धुंद, शोधक
दुसरीकडेच..
विचारात
विचारतो
मग मी ?
शेवटी ?
माझ काय ?
नजर तशीच एकवटलेली
तिसरीकडच खीळलेली..
मन किन्चाळत
मग उठत निजत
रडत, ओरडत,
हाच तुझा शेवट.
तीही अबोलपणे हेच म्हणते,
हाच तुझा शेवट.
माझी सुरुवात शेवट होते.
सगळी तरुणाई,
उरून न्हाते..
Subscribe to:
Posts (Atom)
.jpg)