माझ्या अगदी सरळ सरळ लक्षात आलय की, मला अजिबातच कविता वैगेरे करता येत नाहीत.. एवढच काय .. साहित्याच्या दृष्टीकोनातून बरं वैगेरे लिहिताही येत नाही.. राजकीय हस्तक्षेप वैगेरे तर अगदीच अपुराच पडतो.. मी घरात बसून बोलून, चर्चा करून काहीच उपयोग वैगेरे नाही असं वाटतं.. कधी चर्चा झालीच तर सगळ निष्फळ वाटू लागतं.. बाहेर पडल्यावर रस्त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लागतो.. तिथली मंडळी देशाचं काहीतरी भलं होऊ इच्छितात असं वाटत राहायचं.. तरुण मंडळी अर्ध्या चड्या घालून, कमी कपडे घालणाऱ्या मुलींवर आक्षेप घेत बसायचे.. ( पोलिसांच्या कपड्यात पोलिस शक्यतो गुन्हा करायचे टाळतो, तसा काहीसा हा प्रकार..) शाखेच्या चड्डीत ब्रम्हचारी आणि मग चड्डी बरोबर संस्कृति, संस्कार वैगेरे टान्गुन चकाट्या पीटत देश देश करत impression मारत बसायचे.. लहानपणी खेळण्यासाठी सगळ्यात जवळची जागा, म्हणून जाणं व्हयचं.. पण वय वाढत गेलं, जाणीव होत गेली, कुणीतरी आपल्या हातात झेंडा देतय.. तसा तिथून तडक सुटलो..
वय होतं ९-१० वर्षाचं.. १९९२-९३ मधे त्याच चौकात अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी वैगेरे मंडळीची भाषणे झाली होती.. धर्म वैगेरे संदर्भात काहीतरी बोलत होते.. माझी मामे भावंड त्याच धर्माची वैगेरे होती वाटत.. ती आवर्जुन गेली होती.. आल्यावर भरभरून बोलत होती.. रेल्वेने जावून, दंगल वैगेरे सुद्धा करून आली होती म्हणे.. आल्यावर मामाने आणि सर्व भावा- बहिणीन्नी गावात साखर, पेढे, शिरा वैगेरे काय काय वाटले .. मी सुद्धा खुप खाल्ले.. खुप आदर वाटत होता.. छाती गर्वाने फुलून फुगून वैगेरे गेली होती.. सरळ मित्रांना जावून सगळ कौतुकाने वैगेरे सांगितलन.. ती सुद्धा भारावून गेली आणि आम्ही सर्व सोबत शाखेत नियमाने जावू लागलो.. अचानक एक दिवस त्या चौकात खुप पोलिस होते.. आमच्या खेळण्याच्या जागेवर काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली होती.. काहीतरी देशद्रोही कृति तिथून झाली होती म्हणे.. मला हे काही केल्या पटत नव्हतं.. एकतर तिथली सगळीच मंडळी माझ्या चांगल्या परिचायाची होती.. पुस्तकात बघितलेल्या क्रांतिकारकांच्या तुलनेत वैगेरे ही मंडळी अत्यंत पूळचट.. घाबरी घुबरी .. अगदी माझे वडिल त्यांचा राग जसा आईवर काढतात, तशीच ही मंडळी फारतर कोपऱ्यावरच्या कुत्र्याला दगड़ वैगेरे मारतील.. पण देश द्रोह वैगेरे करायला ही काही लायक नव्हेत, हे पक्क पटल होतं.. नव्हे नव्हे तशी मनाची खात्रीच झाली होती.. पण ह्यांनी मिळून मस्जिद वैगेरे फोडली होती म्हणे.. म्हणजे दुसरया कोणाच तरी प्रार्थना स्थळ उध्वस्थ केलं होतं.. आणि त्यामुळ त्यांना एवढा आनंद झाला होता.. अरे बाप रे.. तर हे अस आहे होय सगळ..
पुन्हा शाखा पूर्ववत सुरु झाल्यावर भूषण एकदा प्रार्थना चालू असताना चड्डीत मुतला.. त्यानंतर मी तिथे जाणंच बंद करून टाकलं.. मग मला उत्सवाला वैगेरे आवर्जुन बोलावल जायच.. तिथे गेल्यावर हा उत्सव नसून दुसरयाच्या दु:खावरच हसण वाटू लागल.. तेंव्हा तेहि बंद.. मग ही मंडळी आग्रहच करू लागली.. मग मी माझ सामाजिक वर्तनच भ्रष्ट करून टाकलं.. त्यांच्या नजरेत खुपाव म्हणून वाईट संगती करू लागलो.. गुंड, मारामारया करणारी, उनाडक्या वैगेरे करत हिंडणारी मुलं माझे सखे- सांगाती होते.. मुलींकडे तसल्या कसल्या नजरेने बघणे.. त्यांच्या शरीराची चर्चा वैगेरे करून आपण group D चे एखादे गणित सोडवत असल्याचा अविर्भाव.. जात, धर्म वैगेरे गोष्टी अभिमान वैगेरे बाळगण्यासाठी नसून, वेळप्रसंगी ही मुलगी आपल्या जातीची आहे. ती बामण आहे म्हणून दस्सा वैगेरे आहे, पण तिच्यात दम वैगेरे नाही रे.. यासाठी वापरल्या जाऊ लागल्या.. हा विनियोग मला आवडत वैगेरे होता अश्यातला भाग नाही.. पण आधीच्या कर्मकांड, विचार, क्रिया- प्रक्रिया, प्रतिक्रिया यांच्या तीव्रतेच्या तुलनेत हे काहीच नव्हते म्हणून चालले.. मग त्या अर्ध्या चड्डी वाल्या मुलांच्या टोळक्यात मला काही स्थान उरले नव्हते.. निदान त्यातून माझी सुटका झाली होती.. खरा धर्मं पाळल्याचं समाधान मिळलं होत ..
अजूनही सुसंकृत , प्रतिष्टित होण्याची भीतीच वाटते.. उद्या अचानक मान्यवर म्हणून बोलावल तर ? नको नको... एवढा निर्लज्जपणा अजुन मुरलेला नाही.. या पुढे दोनच रस्ते, एकतर घरात, मुला-मुलींच्या संघटनेत बसून बोलायच, दुसर चांगल्या गुंडान्शी सम्बन्ध वैगेरे ठेवायचे.. राजकीय पक्ष, संघटना.. धसका नाहीतर धक्का देतात.. धर्म वैगेरे काहीतरी बोलत राहतात.. त्यांना बोलू देत.. आपल काय जातय ( आणि जात जरी असलं तरी काय शष्प वाकड करणारे मी ( आम्ही ) कोणाचं ? )
थोडक्यात, ज्या त्या धर्माचा, पक्षाचा, संघटनेचा.. त्यातल्या सुन्दर दिसणाऱ्या बायका, पोरींचा.. त्यांच्या सर्व भावंडांचा, त्यांच्या देशप्रेमाचा / देशद्रोहाचा जय असो.. त्यांच्या आईचाही जय असो..
Thursday, October 7, 2010
Subscribe to:
Posts (Atom)
.jpg)