Friday, March 5, 2010

मी मी मी मी

मी मी मी मी
माझ काय चुकलं ? मी कुठे चुकलो ?

काहीच सोबत न घेता जगात चालायला शिकलो..चालताना सोबत करायला, सोबत देते म्हणालीस..म्हणून आश्चर्याने पुढच्या पावलात थोडासा अडखळलो...
मग ह्यात मी काय चुकलो ?

आई आई म्हणून बोलायला शिकलो..तिच्याच नावाने रडायला शिकलो..तुझ्यासमोर रडताना तिचं नाव तोंडात आलं..
काय, मी इथेच चुकलो ?

जगण्याच्या या शर्यतीपेक्षा, तुझी शान मोठी..मार्गावरील अडथळ्यातली,
हि शर्यतच खोटी..माझ स्वप्न, माझ्या इच्छा, माझ क्षितीज, माझ्या आकांक्षा.. असं म्हणत बसलो..
कदाचित, इथेच मी फसलो ?

देव नाही, दानव नाही.. मग कोणाला इथे काही नैतिकताच नाही.. एकविसाव्या शतकात स्वतंत्रता हाच शाप बाई..
माझ्या प्रत्येक कृतीला मीच आहे जबाबदार.. म्हणून प्रत्येक कृतीच प्रायश्चित्त घेत सुटलो..
अरेरे, मी बहुदा प्रायश्चित्तच चुकलो..

माझा 'मी' पण नडला असेल बहुदा.. माझा 'तू' पणा बाधला असेल बहुदा.. मी, 'मी मी' 'तू तू' करत बसलो..
अरे हा.. इथचं चुकलो.. इथेच चुकलो..