Sunday, August 29, 2010

विठ्ठल स्वतः..


देवाचे देवपण, 
देवात दडून,
देव हा पडून, 
तुझ्यामंदी..

देवाचा गाभारा,
मनाचा आसरा,
तरी हा पसारा,
उरलासे..

विठ्ठलची आशा,
विठ्ठलची दिशा..
विठ्ठल सखा, 
विठ्ठल स्वतः..

सकळ सृष्टी,
भोवती फिरुनी,
उरे ती नेणिव,
दिगन्ताची..

संत हे म्हणती,
कृती जे करती,
विठ्ठल ते होती,
ब्रम्हांडीचे..

No comments:

Post a Comment