Thursday, July 1, 2010

पाउस एक आठवणीतला...

आठवणींच्या आठवणींतून बहरणारा,
उमटणाऱ्या प्रत्येक पालविला,
हिरव्यान रंगवत जाणारा..

नसांमधून खळखळणारया,
कासनुश्या आठवणींचा,
हलकेच फुलू पाहणाऱ्या,
धुक्यातील स्फुरणांचा..

हलक्या सरींच्या,
आठवणींच्या आठवणीचा,
क्षितिजाच्या उंबऱ्यावर,
दाटीन पसरणाऱ्या नभांचा..

काळजातून डोकावत,
मागे मागे जाणारा,
शब्द बनून, चित्र म्हणून,
वेडे गाणे गाणारा..

आठवणींतून साचलेला,
स्मृतींमधून भळभळलेला,
कोपऱ्यात कुठे आत पार,
दडून रुतून बसलेला..

पाउस एक आठवणीतला,
आठवणींनी ओवलेला,
आठवणीतून उमलताना,
आठवणीतच कोसळलेला..

No comments:

Post a Comment