Thursday, July 1, 2010

नवा पाउस...

पाउस एका थेंबाचा,
नेत्रांमधून गळणारा,
केसांतून ठिबकणारा,
स्तनांवरून ओघळणारा,
स्पर्शामधून बहकणारा..

तुझ्या- माझ्या ढगांतून,
सदानकदा कोसळणारा,
सैरावैरा बरसून मग,
अंगा- खांद्यावर चढणारा,
प्रती एका क्षणाला,
एक नवा जन्म घेणारा..

नवा पाउस,
गर्भाशयाचा ताबा घेणारा,
रक्तावर हक्क सांगणारा,
स्तनांना लोंबकाळणारा,
नवा पाउस, नव्या आठवणींना,
नवा जन्म देणारा..

हा पाउस,
इथे तिथे,
सैरावैरा,
जिथे तिथे,
नाही आठवण,
नवी आठवण,
आठवणींचा पाउस,
पावसाची आठवण..

हा पाउस नकटा,
सगळ्यात धाकटा,
थोरल्याचा फटका,
धाकट्याला चटका..

राहील जिथे,
असेल तिथे,
आभाळ थिटे,
पापणी मिटे,
पाणी सुटे..

थोडा खोटा,
थोडा खरा,
नवी कोवळी,
मने जोडणारा,
नवा पाउस...

No comments:

Post a Comment